Posts

उबदार क्षण

Image
#उबदार_क्षण ..!! _________________________________________                            प्रसाद द. पोफळी, नागपूर प्रसंग छोटेसेच … सहजच घडलेले … पण त्यातून काहीतरी सांगू पाहणारे .... परवा 31 डिसेंबर .... इंग्रजी कालगणनेनुसार वर्षांचा शेवटचा दिवस … बाहेर कडाक्याची थंडी … हवामान खात्यानुसार 3 ते 4℃ … ऑफिस मधून जरा लवकरच घरी आलो. तशी संध्याकाळ झालीच होती. अंगणात तुळशीपाशी दिवा लागला होता. घरात आलो .. वडील दारं बंद करून अंगावर शाल गुंडाळून, डोक्याला लोकरीची टोपी घालून पण तरीही थंडीने थरथरत  बसलेले .. आई देवाजवळ रामरक्षा म्हणत .. बायको रात्रीच्या स्वयंपाकाच्या तयारीत .. मुलगा एकटाच कॉम्पुटर समोर बसलेला … मनात आलं आज काही वेगळं करावं … जे नेहमी वर्षभर आपण केलं नाही ते … नव्हे जे वर्षानुवर्षे केलं नाही ते … झालं … आली लहर केला कहर … असं काम …,, जेव्हा आलं मनात तेव्हा ... जे मनात आलं ते … इतवारी लोहाओळीत गेलो … शेगडी घेतली … तिथेच किराणा ओळीत गेलो … सोनीच्या दुकानात...

सुखाचे डोही

Image
प्रसंग छोटेसेच … सहजच घडलेले … पण त्यातून काहीतरी सांगू पाहणारे .... सुखाचे डोही... _____________________________________                    • प्रसाद द. पोफळी, नागपूर अशीच एक पावसाळी संध्याकाळ … नुकताच ऑफिस मधून आलेलो … दिवसभर बरीच धावपळ झालेली…, तीन चार नवीन क्लायंटकडे भेटी, चालू असलेली कामं डेडलाईनच्या आत पूर्ण व्हावी म्हणून साईट व्हिजिट्स इत्यादी आटोपून  घरी यायला बराच उशीर झाला होता . एखादा दिवस असतोच असा की केवळ सकाळच्या घाईघाईत केलेल्या जेवणावर आणि दुपारी वेळातवेळ काढून घेतलेल्या चहावरच दिवस काढावा लागतो. घर आल्या आल्या मस्त कोमट पाण्याने  आंघोळ करून आल्यावर दिवाणावरील लोडाला पाठ टेकली. सकाळी व्यवस्थित जेवण झालं नसल्याने आता बायकोला छान गरम गरम पोळ्या करून वाढायला सांगावं असा विचार करीत असतांनाच स्वयंपाक घरातून गृहकर्तव्यदक्ष गृहिणी विचारत्या झाल्या ... "अहो, आता तुमचं रात्रीचं जेवण कसं आहे ?" आज सूर वेगळा होता. रागरंग कसा आहे याचा जरा अंदाज घ्यावा म्हणू फार न बोलता मी एक शब्दात विचारले ... "म्हणजे ...??" "नाह...

चुन आणि चकली...

Image
   चुन आणि चकली... ______________________________________                               प्रसाद द. पोफळी, नागपूर  प्रसंग छोटेसेच … सहजच घडलेले … पण त्यातून काहीतरी सांगू पाहणारे .... 'अरे वा ! आज "चुन" केलं दिसतंय !!' उन्हाळ्यातील अशाच एका संध्याकाळी आसटसर खिचडी सोबत घट्ट बेसन भाकरीचा जेवणाचा बेत बघितल्यावर मी सहजच उद्गारलो. सांडगे, पापड, लोणचं, कांदा इत्यादी आवडणारे पदार्थ सोबत होतेच. 'बाबा, आता हे चुन काय वेगळं असतं ? बेसनच आहे ना !!', माझ्या "चुन" या शब्दाने चकित होऊन नेहमी संगणकीय भाषेच्या अभ्यासात गर्क असणारे आमचे "नर्म पेहरावी तंत्रज्ञ" चिरंजीव ( शुद्ध मराठीत सांगायचं तर सॉफ्ट वेअर इंजिनिअर ) बोलते झाले. 'असं सगळं सारखंच नसतं रे … आळण, बेसन आणि चुन सगळेच पदार्थ बेसनापासूनच तयार होतात. पण आळण जरा पाण्याचे प्रमाण जास्त असलेले, पातळसर वाटीत घेण्याजोगे ; बेसन त्याच्यापेक्षा जरा घट्ट, पाण्याचे प्रमाण आळणापेक्षा कमी असलेले, पण ताटात घेतल्यावर थोडेसे पसरणारे आणि चुन म्हणजे पाण्याचे प्रमाण...